Advertisement

E.mail information in marathi

E.mail information in marathi ईमेल ('Electronic Mail' ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरूप)किंवा ई-मेल हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा इंटरनेटचा वापर करतात. इलेक्ट्रॉनिक मेल, ज्याला आपण रोजच्या वापरात ई-मेल ह्या नावानी ओळखतो, ती एका प्रकारची डिजिटल संदेशांची देवाण घेवाण आहे. ई-मेलने एका लेखकाने संगणकावर टंकलिखित करून पाठवलेला मजकूर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या एका किंवा अनेक वाचकांपर्यंत पोहोचतो. आजचे आधुनिक ई-मेल हे स्टोअर (साठवा) आणि फॉरवर्ड (पुढे पाठवणे) ह्या धर्तीवर बनवले गेलेले आहेत. ई-मेल सर्व्हर संदेश प्राप्त करतात, संदेश पाठवतात आणि संदेश साठवूनसुद्धा ठेवू शकतात. त्यासाठी आता संदेश पाठवणारे, वाचणारे आणि त्यांचे संगणक हे ऑनलाइन असण्याची गरज नाही. ते थोड्या काळासाठी एकमेकांबरोबर जोडले गेले तरी संदेश पाठवता येतो. हा थोडा काल एक संदेश पाठवण्यास लागणाऱ्या वेळापर्यंत सीमित असतो.

marathi

Post a Comment

0 Comments